
सामना ऑनलाईन । कोची
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देखील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात येत होते. मात्र याविरोधात चकवून 40 वर्षाच्या दोन महिला बिंदू आणि कनकदुर्गा यांनी बुधवारी पहाटे थेट प्रवेश केला. तो व्हिडीओ प्रसिद्ध होताच मंदिराच्या विश्वस्त मंडळाने भाविकांसाठी प्रवेश बंद केला. तसेच मंदिराचे शुद्धीकरण केल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
Kerala’s #SabarimalaTemple shut for purification rituals. Two women devotees in their 40’s had entered the temple in the early morning hours today. pic.twitter.com/jMefTpCsCE
— ANI (@ANI) January 2, 2019
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या वादानंतर आज दोन महिलांनी शबरीमला मंदिरात केलेल्या प्रवेशामुळे अनेक वर्षांची परंपरा ही नष्ट झाली. कोणताही गाजावाजा न करता, काळ्या रंगाची वस्त्रे नेसून आलेल्या या महिलांनी इथल्या परंपरेप्रमाणे 18 पायऱ्या चढून मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या सोबत दोन अधिकारी देखील होते. मंदिराच्या सुरक्षारक्षकांना काही कळण्याच्या आत त्यांनी दर्शन घेतले. त्याचा व्हिडीओ नंतर प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाला धक्का बसला. त्यांनी या घटनेची निंदा केली आणि मंदिराचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच मंदिरात महिला शिरल्याने ते अशुद्ध झाले असल्याचे म्हणत शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरुष भक्तांना प्रवेश दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
#WATCH Two women devotees Bindu and Kanakdurga entered & offered prayers at Kerala’s #SabarimalaTemple at 3.45am today pic.twitter.com/hXDWcUTVXA
— ANI (@ANI) January 2, 2019
दरम्यान, शबरीमला मंदिरात ज्या महिलांना प्रवेश करायचा आहे त्यांना पोलिसांनी पूर्ण संरक्षण द्यावे अशा सूचना देण्यात आल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी म्हटले आहे.
Kerala Chief Minister Pinarayi Vijayan: Today, two women entered #SabarimalaTemple. We had issued standing orders to police to provide all possible protection to any woman who wants to enter the temple. pic.twitter.com/GdfS2BEi6i
— ANI (@ANI) January 2, 2019



























































