
बहुप्रतिक्षित केजीएफ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा टीझरही लवकरच लॉन्च होणार असून त्याची प्रदर्शनाची तारीख कळणार आहे.
Let’s set foot into the empire #KGF2TeaserTomorrow at 10:18 AM on @hombalefilms.
Premiering Now: https://t.co/3xoDtHZ0be
Set up your reminders now!@VKiragandur @TheNameIsYash @prashanth_neel @duttsanjay @TandonRaveena @SrinidhiShetty7 @BasrurRavi @bhuvangowda84
— Hombale Films (@hombalefilms) January 7, 2021
2018 मध्ये केजीएफ चित्रपट रीलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या दुसर्या भागात संजय दत्त मुख्य व्हिलनच्या भुमिकेत दिसणार आहे. त्याचा पोस्टरही रीलीज करण्यात आला होता. हा पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
आता निर्मात्यांनी टिझरची तारीख जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच 8 जानेवारी शुक्रवारी सकाळी 10.18 वाजता प्रदर्शित होणार आहे. तसेच या टिझरसोबत प्रदर्शनाची तारीखही कळणार आहे.



























































