खडकीत अल्पवयीन मुलाकडून 5 दुचाकींची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुण्यातील खडकी येथे रस्त्यालगत पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या 5 दुचाकींची अल्पवयीन मुलाने तोडफोड केली. त्याचा जाब विचारणाऱ्याला एकाला त्याने दांडक्याने मारहाण केली. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खडकीतील बुद्धविहारालगत घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सिद्धार्थ मोते सरदार (वय 30, रा. खडकी )यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल खडकी परिसरात काम करणाऱ्या नागरिकांनी बुद्धविहारालगत दुचाकी वाहने उभी केली होती. त्यावेळी तेथे आलेल्या अल्पवयीन मुलाने अचानकपणे दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये 5 दुचाकींचे नुकसान झाले आहे.

परिसरातील एकाने अल्पवयीन मुलाला दुचाकी तोडफोडीचे कारण विचारले असता, त्याने संबंधिताला लाकडाने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार संजय आढारी तपास करीत आहेत.