टिक टिक वाजते… खणाच्या कापडाची कलात्मक घडय़ाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्याची मैथिली मोहोळकर आणि संभाजीनगरचा अतुल कुंजर या दोघांनी कलात्मक घडय़ाळे तयार केली आहेत. खणाचे कापड, ज्यूटपासून ही घडय़ाळे बनवण्यात आली आहेत. ही घडय़ाळे लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांनी या संकल्पनेवर काम केले. मैथिली-अतुलने जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलेचे शिक्षण घेतले आहे. दोघे इंटिरिअर डिझाईनचे काम करतात.

इन्स्टॉलेशन्स, पेंटिंग वगैरे इंटिरिअरमध्ये असते, पण त्यातही वेगळे काय करता येईल, या दृष्टीने मैथिली आणि अतुलने विचार सुरू केला. त्यांनी खणाचे कापड, ज्यूट यांपासून टेबल घडय़ाळ, भिंतीवरचे घडय़ाळ बनवायचे ठरवले. त्या वेळी मैथिली-अतुलने या प्रोजेक्टची तितकीशी प्रसिद्धी केली नाही, पण यंदाच्या दिवाळीच्या तीन-चार दिवसआधी प्रॅब्रिक क्लॉकचा व्हिडीओ बनवून शेअर केला आणि त्यांना खूप जास्त ऑर्डर मिळाल्या.

l फॅब्रिक क्लॉकला परदेशातूनही मागणी येऊ लागली आहे. नववर्षाची भेट देण्यासाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्टसाठी ही घडय़ाळे चांगला पर्याय ठरू शकतात. studio burntumber या इन्स्टाग्राम पेजवर यासंदर्भातील अधिक माहिती मिळवता येईल.
l मैथिली सांगते, वीणकाम तसेच शेण, माती अशा इकोफ्रेंडली गोष्टीपासून काही वेगळे करता येईल का, त्यावरही विचार सुरू आहे.