खंडाळा घाटात तीन वाहनांचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई—पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फूडमॉल दरम्यानच्या तीव्र उतारावर एका कंटेनरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर कंटेनरचालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कारला आग लागून जळून खाक झाली. हा अपघात आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

जोखीम चेटियार (36), लुईझा चेटियार (35) आणि जेजियल चेटियार (साडेतीन वर्षे, सर्व रा. नायगाव, वसई, मुंबई) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, तर रमेश भूता निकम (38, रा. चाळीसगाव) हा पंटेनरचालक जखमी झाला. आयआरबीआय कंपनीच्या कामगारांच्या मदतीने व व्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आटोक्यात आणली.