कारमधील स्टंटबाजी पडली महागात, तिघांची रवानगी तुरूंगात

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई पोलिसांनी कारमधून स्टंटबाजी करणाऱ्या 3 तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे तरूण भरधाव कारच्या खिडकीमधून अर्धे अंग बाहेर काढून स्टंट करत होते. त्यांच्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तिघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी या तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून ‘असे करणाऱ्यांची रवानगी थेट तुरुंगात’ असे म्हटले आहे.


मुंबईतल्या खार पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कार्टर रोडवर तीन तरूण रात्रीच्यावेळी कारमधून स्टंटबाजी करत होते. याबाबतची माहिती मिळताच खार पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. स्टंटबाजी करताना या तरूणांच्या हातात बाटल्याही दिसत आहेत. संबंधित तरूण दारूच्या नशेत होते का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या