
खार पश्चिम लिंकिंग रोड येथे 10 मे रोजी रिक्षावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या आरिका श्रीवास्तव (14) या मुलीचा आज मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या हर्षिता कुमार हिची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याची माहिती आज पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
रिक्षावर झाड कोसळलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन्ही मुलींवर हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आरिका हिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून रविवारी सकाळी 6 वाजता मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेले सात दिवस आरिका मृत्यूशी लढा देत होती. दोन दिवसांपूर्वी तिला ब्रेन डेड घोषित केले होते.

























































