
शिवसेनेतर्फे वार्ड क्र. 192 मधील महिलांसाठी मार्गशीर्ष महिन्यानिमित्त हळदीपुंकू आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विभागातील महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. बाराशेहून अधिक उपस्थित महिलांच्या करमणुकीसाठी आयोजित केलेल्या लाईव्ह बँडच्या गाण्यांवर यावेळी ‘बाईपण भारी देवा’ म्हणत महिलांनी ठेका धरत जल्लोष केला.
शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख- आमदार महेश सावंत, भारतीय विमा कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, विभाग संघटक श्रद्धा जाधव, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, आरती किनरे, वैशाली पाटणकर आणि उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, पैलास पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक श्याम चित्रे, प्रभाकर शिरोडकर, युवासेनेचे अभिषेक पाताडे, सायेश माने यांच्यासह माहीम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाखाप्रमुख प्रविण नरे, शाखा संघटक रिमा पारकर, शाखा समन्वयक रविकांत पडियाची, कल्पना पालेकर, चंद्रकांत झगडे, कार्यालय प्रमुख रमेश सोडये, युवासेना शाखा अधिकारी सुशांत गोजारे, राहुल फट आदींनी मेहनत घेतली.
भरघोस बक्षिसांचा वर्षाव
प्रथम विजेती ठरलेल्या गृहिणीला 11 हजार रुपये व पैठणी, द्वितीय विजेतीला 6 हजार रुपये व तृतीय विजेती ठरलेल्या गृहिणीला 3 हजार रुपये रोख व पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गृहिणींसाठी 21 गृहपयोगी वस्तूंचा लकी ड्रॉ काढण्यात आला. वेगवेगळ्या मनोरंजनात्मक खेळांमधून विजेत्या महिलांना उत्तेजनार्थ बक्षिस दिले.


























































