खेर्डी एमआयडीसीत भंगार गोदामाला आग

690

चिपळूण तालुक्यातील खेर्डी एमआयडीसीतील भंगार ठेवण्यात आलेल्या गोदामाला शुक्रवारी रात्री अकरा वाजता भीषण आग लागली. आग लागताच परिसरातील लोकांनी अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर चिपळूण,पोफळी आणि लोटे येथून अग्निशमन बंब दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. या आगीत भंगार जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या