पुलवामातील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी बालगोपाळांनी जमा केला निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड 

काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद हिंदुस्थानी सैनिकांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य मदत फेरी रविवारी दिंद्रुड येथे आयोजित करण्यात आली होती. माध्यमिक विद्यालय दिंद्रुड,आई प्रतिष्ठान दिंद्रुड, दिंद्रुड पत्रकार संघाने या फेरीचे आयोजन केले होते.

या फेरीमध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांकडील मदत पेटीत एकुण २५ हजार २९०, माध्यमिक विद्यालय दिंद्रुड शिक्षकांनी ५०००रुपये व आई प्रतिष्ठानने ५०००रु असे एकुण ३५ हजार २९० रुपये जमा केली असून जिल्हाधिकारी एमडी सिंह यांच्याहस्ते शहीद सैनिक बांधवांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात येणार आहे.