कियाराने गिरवले मराठीचे धडे

कियारा अडवाणी ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात सुकू या मराठमोळ्या मुलीची भूमिका साकारत आहे. कियाराने आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा ही खूप वेगळी आहे.  त्यासाठी तिने मराठीचे धडे गिरवले.याबद्दल कियारा म्हणाली,  सुकू वेगळीच आहे. तिची चालण्याची आणि बोलण्याची एक खास पद्धत आहे. सुकू खूप वेगाने बोलते. ती मराठी मुलगी आहे म्हणून मला काही विशिष्ट शब्द शिकावे लागले. ती स्टेज डान्सरदेखील आहे, त्यामुळे तिची एक विशिष्ट देहबोली आहे. छोटे तपशील सुकूच्या व्यक्तिरेखेमध्ये येणे खूप महत्त्वाचे आहे आणि मला मार्गदर्शन करण्यासाठी शशांक खेतान होता. त्याने माझ्यासाठी मराठी प्रशिक्षक बोलावले होते. त्याबद्दल मी त्याचे आभार मानते. 16 डिसेंबर रोजी ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.  त्यामध्ये विकी काwशल एका हटके भूमिकेत दिसेल. भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.