गुडघेदुखीवर ‘पीआरपी’थेरेपी फायदेशीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्टिओआर्थायटिस हा गुडघ्यांचे सांधे सततच्या वापरामुळे झिजल्याने उद्भवणारा आजार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये नी रिप्लेंसमेंटऐवजी प्लेटलेट रिच प्लाझ्मा अर्थात पीआरपीचा वापर करून गुडघा वाचवता येणार आहे. पीआरपी ही वेदनांचे व्यवस्थापन करणारी क्रांतीकारी उपचारपद्धती आहे. यात रुग्णाच्या शरिरातील प्लेटलेट्स इन्जेक्ट करून खराब झालेले स्नायूबंध यांचे पुनरुज्जीवन केले आहे. ही शस्त्रक्रिया वेदना दूर करण्यासाठी यशस्वी ठरतेच, पण त्याचबरोबर दुखणे बरे करण्याची प्रक्रियाही ताबडतोब सुरू करते, अशी माहिती के.जे.मित्तल रुग्णालयाचे ऑर्थेपेडिक सर्जन डॉ. गौतम शाह यांनी दिली.