‘कोडगे’ची बाजी, ‘बेस्ट’ची एकांकिका स्पर्धा रंगली

‘बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ’ एकांकिका विभाग आयोजित स्वर्गीय विनोद पराडकर स्मृती आंतर आगार एकांकिका स्पर्धा नुकतीच रवींद्र नाटय़मंदिर येथे पार पडली. स्पर्धेत एकूण 12 एकांकिका सादर झाल्या. यामध्ये ‘कोडगे’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. ही एकांकिका वाहतूक विभाग व विद्युत कार्य विभाग, वडाळा आगारने सादर केली.

प्रवर्तन व परिरक्षण मध्य उत्तर विभाग, वडाळा आगारच्या ‘आंधळी कोशिंबीर’ या एकांकिकेला द्वितीय क्रमांक मिळाला, तर गोरेगाव आगारच्या (इमारत विभाग) ‘लेखकाचा कुत्रा’ एकांकिकेला तृतीय क्रमांक देण्यात आला.

नाटय़ समीक्षक संजय कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा ज्ञाते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी डॉ. राजेंद्र पाटसुते, धनंजय पवार, ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी शेट्टी, विजय सूर्यवंशी तसेच जितेंद्र पराडकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन एकांकिका विभागाचे मानद सचिव अरुण माने यांनी केले होते.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  -मिलिंद कांबळे (एकांकिका ‘आंधळी कोशिंबीर’), संविद नांदलस्कर (एकांकिका ‘कोडगे’)
सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार  – संविद नांदलस्कर (एकांकिका ‘कोडगे’), नितीन भोसले (एकांकिका ‘आंधळी कोशिंबीर’)
राजकुमार सावंत (एकांकिका ‘लेखकाचा कुत्रा’)
सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार – सविता देशमुख (एकांकिका ‘देवाची माणसं’), संध्या पुरव (एकांकिका ‘त्यात पडला पाऊस’)
सर्वोत्कृष्ट लेखक – योगेश शिंदे (एकांकिका ‘सुवर्णलग्न’), प्रशांत धुमाळ (एकांकिका ‘चिंगी’)