कोल्हापूर- 72 वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित, कोल्हापूरकर धास्तावले

530

इंचलकरजी येथील कोरोनाबाधित एका वृद्धाचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असताना, सोमवारी इचलकरंजी येथील आणखी एका 72 वर्षीय वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, वस्त्रनगरी धास्तावली आहे.

यामुळे इंचलकरंजी येथे 3 तर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या 15वर पोहोचली आहे. यातील 6 रुग्ण बरे झाले आहेत. 8 जणांवर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात तर एका रुग्णावर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरातील या वृद्धावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. काल रविवारी पुढील उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये कोरोना कक्षात दाखल करून, स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.आज दुपारी आलेल्या अहवालात हा वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी वैद्यकीय सुत्रांनी दुजोरा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या