Video – करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या रथोत्सव सोहळ्यात कोल्हापुरकर न्हाऊन निघाले आहेत. अंबाबाईच्या जयघोषात, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदारांसह आकर्षक रोषणाईत चांदीच्या रथातून शनिवारी रात्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला.

वर्षातून एकदा श्री अंबाबाई कोल्हापूर नगरवासीयांच्या भेटीला निघण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी कोल्हापुरात अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पाडतो. यावेळी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी कोल्हापूरातील रस्ते गजबजून गेले होते.