
करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या किरणोत्सवात आज सलग दुसऱ्या दिवशीही मावळतीच्या सूर्याच्या किरणांनी देवीचे मुखकमल उजळून निघाले. हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा आविष्कार असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून उत्तरायण आणि दक्षिणायनमध्ये दोन वेळा किरणोत्सव सोहळा होतो.यंदा चौथ्या दिवशीही मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या मुखकमलापर्यंत पोहोचली. सायंकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी किरणे चेहऱ्यावरून पुढे किरीटापर्यंत येऊन लुप्त झाली.























































