Live कोल्हा’पूर’… शाळा महाविद्यालयांना 8 व 9 ऑगस्टलाही सुट्टी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कोल्हापूर

  • पूरस्थिती कायम असल्याने शाळा महाविद्यालयांना 8 व 9 ऑगस्टलाही सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली
  • शाहू मार्केट यार्ड येथील भाजीपाला व फळांची आवक दुसऱ्या दिवशीही झाली नाही, दोन दिवस तुटवडा जाणवणार
  • शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश सर्वच पेट्रोल- डिझेल संपले असून सर्व पेट्रोल पंप दुस-या दिवशीही बंद
  • महापुरामुळे कोल्हापूरला येणारे सर्वच प्रमुख मार्ग बंद होऊन संपर्क तुटल्याने पेट्रोलसह, भाजीपाल्यांवरही मोठा परिणाम
  • कोल्हापूरमधील पूरपरिस्थिती अधिक गंभीर, अनेक गावांचा संपर्क तुटला

‘पुरात जीव अडकला’, कोल्हापूरच्या पुराचा फटका कलाकारांनाही बसला

  • कोल्हापूर येथील पूराची नौदलाच्या हेलिकॉप्टरने टिपलेली दृश्य

 

  • कोल्हापूर हायवेवर शिरोली जवळ 6 फूट पाणी

kolhapur-highway

  • पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आकाशवाणी वरून आवाहन… ‘प्रशासन यंत्रणा सर्वोतपरी कार्यरत, नागरिकांनी सहकार्य करावे’
  • एनडीआरएफची टीम मदतीसाठी तयार होत असतानाची दृश्य
  • नागरिकांच्या मदतीसाठी नौदलाचे हेलिकॉप्टर सज्ज होताना
  • नौदलाचे हेलिकॉप्टर कोल्हापूरमध्ये दाखल, सोबत 5 रेस्क्यू टीम

navy-flight

  • आज सकाळी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून आता तो 4 लाख क्‍युसेक करण्यात आला
  • अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविला

army-help

  • लष्कराची टीम कोल्हापूरमध्ये दाखल… परंतु पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे शिरोली पुलापलीकडे थांबून…
  • जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती
  • एनडीआरएफसह कोल्हापूरमध्ये सैन्याचे पथक मदतीसाठी दाखल
  • एनडीआरएफच्या मदतीने अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
  • शहरातील अनेक भागांमध्ये 15 ते 20 फूट पाणी
  • शाळा-महाविद्यालयांना तीन दिवसांपासून सुट्ट्या
  • दोन आठवडे सलग पाऊस
  • जिल्ह्यातील सर्व धरणं भरली
  • कोल्हापूरमध्ये महापूर, अनेक गावांचे बेटांचे स्वरुप