
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आता अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची जोड मिळाली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने गोकुळच्या सत्ता संघर्षाला निर्णायक वळण मिळाले आहे. 15 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्यास सुरुवात होणार असून, 8 ऑक्टोबरला माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक बिनविरोध होणार का, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, 18 ऑक्टोबरला मतदान आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.


























































