कोल्हापुरात पूर, पंचगंगा नदी धोका पातळीच्याही पुढे; नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू

5930

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आज कमी अधिक राहिल्याने, काल रात्री दहाच्या सुमारास 39 फुटांची इशारा पातळी गाठलेल्या पंचगंगा नदीने आज दुपारी चारच्या सुमारास 43 फुटांची धोका पातळी ओलांडली. सायंकाळी सातच्या सुमारास ही पातळी 43.7 इंच झाली होती. शहरात कुंभार गल्लीसह अनेक घरांत पुराचे पाणी घुसु लागले असुन पुरग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येऊ लागले आहे.

ऐतिहासिक राधानगरी धरणही सायंकाळी सातच्या सुमारास शंभर टक्के भरल्याने, स्वयंचलित 3 आणि 6 क्रमांकाचे दरवाजे उघडले असून 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

राधानगरी धरण 100 टक्के भरले, धरणातून 2800 तर अलमट्टी धरणातून 31 हजार 922 क्युसेक विसर्ग

दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही सायंकाळपर्यंत 102 बंधारे पाण्याखाली राहिले. यातील चार बंधा-यावरील पाणी कमी झाल्याने, 98 बंधारे पाण्याखाली गेले होते. सकाळी कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर रेडेडोह फुटल्याने, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्ग बंद झाला आहे. तर सायंकाळी चारपर्यंत 32 मार्ग बंद झाले होते.

गगनबावडा तालुक्यात 243 मिमी पाऊस
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक 243 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर हातकणंगले- 65.13, शिरोळ- 48.43, पन्हाळा- 99.43, शाहूवाडी- 89.33, राधानगरी- 152.17, करवीर- 115.36, कागल- 129.86, गडहिंग्लज- 65.57, भुदरगड- 89, आजरा- 144.50, चंदगड- 145.17 अशी नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या