राधानगरी धरण 100 टक्के भरले, धरणातून 2800 तर अलमट्टी धरणातून 31 हजार 922 क्युसेक विसर्ग

6688

गुरुवारी सायंकाळी राधानगरी धरण 100 टक्के भरले. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी अधिक असल्याने,सायंकाळी सातच्या सुमारास धरण शंभर टक्के भरले होते.त्यामुळे धरणाचे 3 व 6 क्रमांकाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले होते. यातून 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात 65.657 टीएमसी पाणीसाठा होता. तर कर्नाटकातील अल्लमट्टी धरणात 94.362 टिएमसी पाणीसाठा असून 31 हजार 922 क्युसेक विसर्ग‌ वाढविण्यात आला आहे.

कोल्हापुरात पूर, पंचगंगा नदी धोका पातळीच्याही पुढे; नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू

कोयनेतून विसर्गापूर्वी पूर्व सूचना दिली जाईल
आज संध्याकाळी 6 वाजता कोयना धरणात 67.27 टीएमसी पाणीसाठा असुन धरणातील पाणीसाठा 80 टीएमसीच्यावर गेल्यानंतरच कोयना धरणातून कोयना नदीमध्ये विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी आहे. विसर्गाबाबत पूर्व सूचना दिली जाईल अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या