खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पोलिसांकडून 50 हजारांची मागणी, पीडिताचा जलसमाधीचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 50 हजार रुपये मागणाऱ्या पोलिसांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने सुनिल शांताराम बागम (वय – 38, रा. जयहिंद कॉलनी, कत्यायनी कॉम्लेक्स, कळंबा) याने आज दुपारी रंकाळा तलावात उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी यात्रिंक बोटीचा वापर करून त्याला वाचवले. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करवीर पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांनी बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडवकण्याची भिती दाखवून 50 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे देण्यास नकार दिल्यामुळे डांबून मारहाण केल्याची तक्रार सुनिल बागम यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी केली होती. पण न्याय मिळत नसल्याने, आज रंकाळा तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा बागम याने दिला होता.

img-20200912-wa0016

या पार्श्वभूमीवर आज सकाळी रंकाळा तलावावर महानगरपालिकेच्या यांत्रीक बोटीसह अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्वाच्या नजरा चूकवून, बागम याने दुपारी बाराच्या सुमारास रंकाळा तलावात आत्महत्या करण्यासाठी उडी टाकली. यावेळी यांत्रीक बोटीद्वारे त्याला वाचविण्यात आले.