कोल्हापुरातील ‘मटण’दराचा प्रश्न पुन्हा पेटला, मटणविक्री बेमुदत काळासाठी बंद

836

पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापुरात तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे्. मात्र कोल्हापुरात पुन्हा एकदा मटणाच्या किंमतीवरून वाद सुरू झाला असून विक्रेत्यांनी बेमुदत काळासाठी मटणविक्री बंद केली आहे. बकरी महाग झाल्याने तसेच कृती समिती दर कमी करण्यावर अडून बसल्याने मटण विक्रेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. मटणविक्री बेमुदत बंद करण्यासोबत मार्टेकमध्ये ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.

मटणाचे दर वाढल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कोल्हापुरकरांना मटणाला 480 रुपये किलो एवढा दर खाटीक समाजाने मान्य केला होता. यानंतर कोल्हापूरकरांनी मटणाचा वाद सुटला म्हणून जल्लोषही केला. मात्र बकरी महाग होत असताना कृती समिती दर कमी करण्याचा आग्रह करत असल्यामुळे मटण विक्रेते वैतागले आणि त्यांनी बेमुदत बंदची हाक दिली. मटण विक्रेत्यांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी ‘मटणाचा दर आमचा अधिकार’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

किलोला 1000 रुपये देतो, तुम्ही नियमाने वागणार का? मटणदराचा प्रश्‍न पुन्हा पेटला

आपली प्रतिक्रिया द्या