
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विस्कळीत झालेली रेल्वेसेवा आता ट्रॅकवर येताना दिसून येत आहे. कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस, मिरज-कोल्हापूर, सांगली-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. रेल्वेकडून पॅसेंजर सेवा सुरू करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदारवर्ग, चाकरमनी यांना फायदा होणार आहे.
कोरोनासंसर्गात बंद पॅसेंजर सेवा तब्बल 2 वर्षांनी पूर्ववत होत आहे. यामध्ये कोल्हापूर-पुणे 11 एप्रिल, तर मिरज-कोल्हापूर, सांगली-कोल्हापूर पॅसेंजर गाडय़ा 15 एप्रिलपासून सुरू होत आहेत. यामध्ये कोल्हापूर-मिरज-पुणे दरम्यानचे काही थांबे रद्द करून गाडीच्या वेळेमध्ये बदल करीत कोल्हापूर- पुणे पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रुपांतर केले आहे. तर, मिरज-सांगली पॅसेंजरमध्ये वेळेत बदल करीत पूर्वीचे थांबे कायम केले आहेत. मिरज-सांगली पॅसेंजर गाडीच्या वेळेमध्ये 25 मिनिटांचा, तर पुणे एक्स्प्रेसमध्ये 45 मिनिटांचा बदल केला आहे. तर कोल्हापूर-पुणे गाडी कोल्हापूर येथून पहाटे 4.45 ऐवजी पहाटे 5.30 वाजता सुटेल, तर मिरज-कोल्हापूर पॅसेंजर गाडी दुपारी 1.50 ऐवजी 2.15 वाजता कोल्हापूरकडे रवाना होईल.
मिरज-कोल्हापूर वेळापत्रक
मिरज 2.15, जयसिंगपूर 2.27, हातकणंगले 2.44, रुकडी 2.54, वलिवडे 3.01, कोल्हापूर येथे 3 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.
सांगली-कोल्हापूर वेळापत्रक
सांगली रात्री 8. 35, विश्रामबाग 8.39, मिरज 8.55, जयसिंगपूर 9. 13, हातकणंगले 9.30, रुकडी 9.40, वलिवडे 9. 46, कोल्हापूर येथे 10 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.
कोल्हापूर-पुणे वेळापत्रक
कोल्हापूर येथून 5.30 निघणारी पॅसेंजर रेल्वे वलीवडे 5.38, रुकडी 5.44, हातकणंगले 5.54, जयसिंगपूर 6.09, मिरज 6.37, सांगली 6.59, भिलवडी 7.17, किर्लोस्करवाडी 7.34, ताकारी 7.44, भवानीनगर 7.49, शिनोली 7.59, कराड 8.19, शिरवडे 8.29, मसूर 8.34, तारगाव 8.46, रहिमतपूर 8.54, कोरेगाव 09.09, सातारा 9.45, वाठार 10.14, लोणंद 10.49, निरा 11.04, जैजुरी 11 34, सासवड 12.44, पुणे 1 वाजून 35 मिनिटांनी पोहचेल.



























































