कोल्हापूर, साताऱ्यात पावसाची तुरळक हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले असून, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आजही अतिवृष्टी झाल्याने नांदणी आणि चांदणी नद्यांना पुन्हा पूर आला आहे.

तर, भूतवडा तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने जामखेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागांत पाणी साचले होते.

सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला असून, मोहोळ आणि अक्कलकोट तालुक्यांमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली आहे.