हजारो कोलकातावासी कतारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा संघ कतारमध्ये खेळत नाहीय, पण आपल्या आवडत्या फुटबॉलपटूंचा खेळ पाहण्यासाठी आतापर्यंत 9 हजार कोलकातावासीयांनी कतार गाठले आहे. त्यापैकी बहुतांश उपांत्य आणि अंतिम सामना पाहण्यासाठी कतारमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आतापर्यंत 10 ते 15 हजार हिंदुस्थानींनी पूर्व भागातून कतारमध्ये प्रवेश केला आहे. यातील 9 हजार एकटय़ा कोलकात्यातलेच आहेत. यापैकी किमान दीड हजार फुटबॉलवेडे अंतिम सामना पाहतील, असा विश्वास टॅव्हल्स एजंट फेडरेशनने व्यक्त केला आहे.