
पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. कोलकातासह अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील तुंगीपासून सुमारे 27 किलोमीटर पूर्वेला स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.38 वाजता भूकंप झाला. बंगालपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपियन-भूमध्य भूकंपशास्त्रीय केंद्र (EMSC) नुसार, अनेक भागातून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.
बंगालमधील मालदा, नादिया, कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर आणि हुगळी यासह अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्रिपुराच्या अनेक भागातही हे धक्के जाणवले. बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या भूकंपानंतर हे भूकंपाचे धक्के ईशान्य आणि कोलकाता येथे जाणवल्याचे वृत्त आहे.



























































