
येथील ऋतुराज हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत एक महिला आणि दोन मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. मच्थुआपट्टी परिसरातील हॉटेलला आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची तर जखमींना उपचारासाठी 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून फॉरेन्सिक टीम अधिक तपास करत आहे.