
सलग चार पराभवांनी खचलेल्या कोलकात्याला आज बंगळुरूने अक्षरशः नवसंजीवनी दिली. बंगळुरूला इडन गार्डनवर हरवणाऱया कोलकात्याने आज त्यांना घरच्या मैदानावरही मात देण्याचा पराक्रम केला. कोलकात्याने आपल्या तीनपैकी दोन विजय बंगळुरूविरुद्धच नोंदविले आहेत.
कोलकात्याच्या 201 धावांचा पाठलाग करताना विराट आणि फाफने चांगली सुरुवात केली, पण 17 धावांत 2 षटकार आणि 1 चौकार मारत फाफने 17 धावा केल्या. सुयश शर्माने फाफला लवकर बाद केले आणि पुढच्या षटकांत शाहबाजला पायचीत करून दुसरे यश संपादले. आज मॅक्सवेल (5) लवकर बाद झाला. मग विराटने लोमररबरोबर 55 धावांची भागी रचून बंगळुरूला विजयाच्या ट्रकवरच ठेवले. पण कोहली (54) बाद होताच बंगळुरूचा डावही गडगडला. एकही खेळाडू संघाला वेगात धावा काढून देऊ शकला नाही आणि बंगळुरूने दृष्टिपथात असलेला विजय गमावला.
त्याआधी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या जेसन रॉयने 83 धावांची सलामी देताना 29 चेंडूंत 5 षटकार आणि 4 चौकार ठोकत 56 धावा केल्या. जगदिशन (27) आणि व्यंकटेश अय्यर (31) यांनी सामान्य खेळ केला, पण कर्णधार नितीश राणाने 21 चेंडूंत 48 धावा ठोकल्यामुळे कोलकात्याला 200 चा टप्पा गाठता आला. हसरंगा आणि वैशाकने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
आयपीएल गुणतालिका
संघ सा. वि. प. ने. र. गुण
चेन्नई 7 5 2 0.662 10
गुजरात 7 5 2 0.580 10
राजस्थान 7 4 3 0.844 8
लखनौ 7 4 3 0.547 8
बंगळुरू 8 4 4 -0.139 8
पंजाब 7 4 3 -0.162 8 कोलकाता 8 3 5 -0.027 6
मुंबई 7 3 4 -0.620 6
हैदराबाद 7 2 5 -0.725 4 दिल्ली 7 2 5 -0.961 4
टीप- सा-सामना, वि-विजय, प-पराजय,ऩे र.- नेट रनरेट
ही आकडेवारी कोलकाता-बंगळुरूपर्यंतची आहे.
अव्वल फलंदाज
फलंदाज सा. धावा सरासरी 4 6
डय़ुप्लेसिस 8 422 60.28 34 27
कोहली 8 333 47.57 31 11
कॉन्वे 7 314 52.33 33 12
वॉर्नर 7 306 43.71 44 01
अय्यर 8 285 35.62 24 16
अव्वल गोलंदाज
गोलंदाज सा. वि. सरासरी 4 वि. 5 वि.
राशिद 7 14 16.14 0 0
सिराज 8 14 16.64 1 0
अर्शदीप 7 13 15.69 1 0
वरुण 8 13 18.38 1 0
चहल 7 12 18.83 1 0





























































