बिर्याणीचे पैसे मागितले म्हणून ग्राहकाने मारली दुकानदाराला गोळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

दुकानदाराला ग्राहकाकडे एक प्लेट बिर्याणीचे पैसे मागणं चांगलचं महागात पडलं आहे. पैसे मागितले म्हणून ग्राहकाने दुकानदाराला गोळी मारली धक्कादायक घटना समोर आली आहे. कोलकातामधील परगना जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. या घटनेत दुकानदाराचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्म्द फिरोज असं आरोपीच नाव असून तो बिर्याणी खाण्यासाठी दुकानात आला होता. त्याचवेळी संजय मोंडल या दुकानदाराने आरोपीकडे बिर्याणीच्या एक प्लेटचे १९० रुपये मागितले. पैसे देण्यावरून आरोपी आणि दुकानदारात वाद सुरू झाला. रागाच्याभरात आरोपीने थेट दुकानदारावरच गोळी झाडली. या संपूर्ण प्रकारात जखमी झालेल्या दुकानदाराला उपचारासाठी रुग्णालय़ात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याचा आणखी एक साथीदार फरार आहे.