11 डिसेंबरपासून रत्नागिरीत कोकण चित्रपट महोत्सव, दर्जेदार चित्रपटांची मेजवानी

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय ( स्वायत्त ) रत्नागिरी आणि सिंधुरत्न कलावंत मंच या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 16 डिसेंबर दरम्यान कोकण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. संपन्न होणाऱ्या या सभारंभात गोगटे जोगळेकर महाविद्यालय ( स्वायत्त ) रत्नागिरी तसेच भारत शिक्षण मंडळाच्या डी जी के कॉलेज मध्ये सुध्दा चित्रपटांचे स्क्रिनिंग होणार आहे. उद्या 11 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता ग्रंथालय ते राधाबाई शेट्ये सभागृह शोभायात्रा काढण्यात येणार आहे.गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे दुपारी 2.30 उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी सिंधुरत्न कलावंत मंच अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतिश शेवडे सिंधुरत्न कलावंत मंच कार्यवाह विजय राणे, सह कार्यवाह प्रकाश जाधव,समन्वयक डॉ. आनंद आंबेकर उपस्थित रहाणार आहेत.

या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपट पहायला मिळणार आहेत.त्यामध्ये दिनांक 12 डिसेंबर सकाळी 11 वाजता – चित्रपट-दगडी चाळ 2.प्रमुख भूमिका – अंकुश चौधरी, पूजा सावंत.स्थळ – इंटरॅक्टिव्ह हॉल.भारत शिक्षण मंडळाचे डी.जे.के.महाविद्यालय रत्नागिरी.दिनांक 13 डिसेंबर सकाळी 11 वाजता – चित्रपट-सरला एक कोटी.प्रमुख भूमिका – ओंकार भोजने,स्थळ – राधाबाई शेट्ये सभागृह,गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी.दिनांक 14 डिसेंबर सकाळी 11 वाजता – चित्रपट- बॉईज 3 प्रमुख भूमिका – पार्थ भालेराव, पूनम भागवत स्थळ – राधाबाई शेट्ये सभागृह,गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी.दिनांक 15 डिसेंबर सकाळी 11 वाजता – चित्रपट- गोष्ट एका पैठणीची राष्ट्रीय पारितोषिक विजेता मराठी चित्रपट,स्थळ – इंटरॅक्टिव्ह हॉल.भारत शिक्षण मंडळाचे डी.जे.के.महाविद्यालय रत्नागिरी