रत्नागिरीत घराला लागली आग

741

रत्नागिरी शहरातील बंदररोड येथील एका घराला बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता भीषण आग लागली. आग भडकताच धुराचे लोळ उडाले. बंदररोड येथील रवी भोसले यांच्या घराला ही आग लागली आहे.

घराच्या एका खोलीतून अचानक आग लागली. सुदैवाने त्या खोलीत कुणीही नव्हते. आग अhouseन्य खोल्यातून पसरत असतानाचा नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक नागरिक आणि अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. याआगीत भोसले कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. दाटीवाटीची वस्ती असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. रस्ता खराब असल्याने घटनास्थळी पोहोचायला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या