
डॉ. श्रीनिवास रेड्डी यांची हत्या करणाऱया आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने बुधवारी ताब्यात घेतले आहे. वर्धन के. ए. (20) असे त्याचे नाव असून कर्नाटकातील चिंतामण तालुक्यातील अणूर या गावातून त्याला ताब्यात घेण्यात आले. हत्येच्या घटनेनंतर तो फरार होता. आज दुपारी त्याला कणकवलीत आणून स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या घटनेत अन्य चार संशयित फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. बंगळुरू येथील रेड्डी यांची त्यांच्या कारमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह साळीस्ते येथे, तर कार तिलारी येथील एका पुलानजीक टापून देण्यात आली होती. या खून प्रकरणातील चौघांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते.





























































