
महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड स्थानकांदरम्यान सहा विशेष फेऱ्या धावणार आहेत. 14 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी या तीन दिवसांत विशेष गाडय़ांची व्यवस्था केली असून उद्या मंगळवारपासून जादा गाड्यांचे आरक्षण सुरू केले जाणार आहे.
महाशिवरात्रीला कोकण रेल्वेने जादा गाडय़ांचे नियोजन केले आहे. त्यापैकी गाडी क्रमांक 01129 सीएसएमटी ते सावंतवाडी रोड विशेष गाडी शनिवारी 14 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी रोजी सीएसएमटी येथून रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी वाजता सुटेल. तसेच गाडी क्रमांक 01130 सावंतवाडी रोड-सीएसएमटी विशेष गाडी 14 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी रोजी सावंतवाडी रोड येथून सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुटेल. या विशेष गाडय़ांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे.




























































