
कोपरगाव येथील झगडे फाटा ते पुणतांबा चौफुली रोडवर उभ्या डंपरला दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात हॉटेल माइल स्टोन समोर, कोपरगाव हद्दीतील डाऊच खुर्द शिवारात रात्री आठ वाजेच्या सुमारास झाला.
या भीषण अपघातात उभ्या डंपरला धडक दिल्याने भाऊसाहेब सखाराम केदार (54), (रा. गाभण वाडी मुक्काम पोस्ट चंदनापुरी तालुका संगमनेर.) याचा मृत्यू झाला. गुरुवारी (20) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास माईल स्टोन हॉटेल समोर आरोपी याने आपले ताब्यातील डंपर क्रमांक एम एच 14 सीपी 6534 ड्रायव्हर साईडचे चाक पंचर/ नादुरुस्त झाले नंतर वाहन रोडचे खाली सुरक्षित न लावता धोकेदायक परिस्थितीत रोडवर लावले.
वाहनाचे पाठीमागील भागात पार्किंग लाइट, इंडिकेटर लावला नाही व वाहनाचे मागील भागात सुरक्षित अंतरावर वाहन नादुरुस्त आहे. याबाबतचे निशाणी लावली नाही. अडथळा उभा केला नाही. त्यामुळे झगडे फाट्याकडून पुणतांबा चौफुलीकडे जाणारे मोटरसायकल क्रमांक एमएच-17 बी.एच. 8665 वरील स्वार भाऊसाहेब सखाराम केदार यांची मोटरसायकल डंपरवर आदळून अपघात होऊन ते जागीच मयत झाले आहेत. डंपर चालकांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































