कोपरगावातील अवैध कत्तलखान्यावर नगरपालिकेचा हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर ही सातत्याने छुप्या पद्धतीने कोपरगाव शहरातील संजय नगर भागात गोवंश हत्या मोठ्या प्रमाणात केली जात होती वारंवार या संबंधात तक्रारी करूनही पोलीस कारवाई झाल्यानंतरही घराच्या कंपाऊंडच्या आडोशाने अवैध कत्तलखाने सुरू होते.

याबाबत गेल्या महिन्याभरापासून कोपरगाव शहरातील हिंदू संघटना गोवंश हत्या बंदी समिती यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर शनिवारी सकाळी साडे दहा पावणेअकराच्या सुमारास नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेने शहर पोलीस, कमांडो पथक नगरपालिका विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी जेसीपी अशा सर्व ताफ्यासह ही जोरदार कारवाई केली. या कारवाईत या भागातील आठ ते दहा कत्तलखाने उद्ध्वस्त केले. पोलिसांची कारवाई सुरू असताना वातावरणात काही काळ तणाव होता, परंतु पोलिसांचा प्रचंड ताफा पाहिल्यानंतर मात्र शांततेत कारवाई सुरू राहिली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी होती.

उच्च न्यायालयाने कत्तलखाना बंद करण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या काळात 2003-04 साली अवैध कत्तलखाने उठविण्यात आले होते. राजेंद्र झावरे यांनी औद्योगिक वसाहतीचा मनाई भागात आधुनिक कत्तलखानासाठी जागा मिळवली होती.

तत्कालीन आमदार अशोक काळे यांनी यासाठी कोट्यवधीचा निधी दिला होता. परंतु, येथील कुरेशी समाजाने त्याकडे दुर्लक्ष केले व केवळ विक्रीची परवानगी असताना संजयनगर भागातच कत्तलखाने सुरू ठेवले. यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता. या ठिकाणी कत्तल केली जाणाऱ्या जनावरांचे रक्तमांस शहरातील मोठा खंदक नाला यातून वाहत जाऊन थेट गोदावरी नदीच्या पाण्यात मिसळत होते गोवंशाच्या बंदी झाल्यानंतर सातत्याने शहरातील हिंदू संघटनांनी याबाबत पाठपुरावा केला.

पोलिसांनीही अनेकदा मोठाल्या कारवाया केल्या परंतु येथील काही विक्रेते मात्र ऐकत नव्हते. शेवटी शनिवारी सकाळी अकरा वाजता नगरपालिकेने अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करून कारवाई केल्यामुळे परिसरातील नागरिक व संघटना यांनी समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईत नगरपालिका प्रशासन शहर पोलीस कमांडो पथक यांनी भाग घेतला. कारवाईसाठी थँक्यू कारवाईसाठी दोन जेसीबी वापरण्यात आले.