
गुढीपाडवा निमित्त प्रातःकालीन पाडवा साजरा करण्याची परंपरा कोपरगाव शहरातील साई गाव पालखी यांनी सुमारे आठ दहा वर्षांपासून सुरू केली. या स्वरोत्सवाची सुचिर्भूतता, चैतन्य, मांगल्य, उपस्थितांचे मन प्रसन्न करते. आज 22 मार्च 2023 रोजी तहसील कचेरी शेजारील साई गाव पालखीच्या अलंकापुरी रंगमंचावर मान्यवरांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने पाच वर्षाच्या लहान चिमुकल्यापासून अबाल वृद्धांची मैफल सजली. भक्ती गीतांनी भक्तिमय वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत केले.
जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती, साई सेवा भक्त मंडळ व शारदा संगीत विद्यालय यांच्यावतीने कार्यक्रमाची दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. नवीन वर्षाचे स्वागत केले.गायक केतन कुलकर्णी, सुरभी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधा भाभी ठोळे, कैलासशेठ ठोळे, विजय बंब, उत्तम भाई शहा, डॉ विलास आचार्य, साई सेवा भक्त मंडळाच्या जेष्ठ महिला भगिनी, (आर टी ओ ऑफिसर) आदींच्या हस्ते (ब्रम्हध्वज) गुढीचे पुजन करून गुढी उभारण्यात आली.
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, लेखा परीक्षक नितीन डोंगरे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पहाट पाडवा संपन्न झाल्यानंतर महिलांनी दुचाकीवरुन शहर फेरी केली.

























































