कोरेगावात एकाच फ्लॅटमध्ये दोन मित्रांची आत्महत्या?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव शहरातील बाजार समितीजवळील एका रेसिडेन्सीतील फ्लॅटमध्ये एका तरुणाचा जळून, तर दुसऱ्याचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. दरम्यान, फ्लॅटमध्ये लागलेली आग पोलीस व शेजारील लोक विझवीत होते. आग विझविल्यानंतर फ्लॅटमध्ये आत जाऊन पाहिले असता, फ्लॅटच्या हॉलमध्ये एकाचा आणि बेडरूममध्ये दुसऱ्याचा मृतदेह आढळून आला.

ऋषिकेश राजेंद्र ताटे (वय 30, मूळ रा. बोधेकाडी, ता. कोरेगाव, सध्या रा. अनन्या रेसिडेन्सी, कोरेगाव), सुभाषकुमार सूरज प्रसाद ऊर्फ अंशू (वय 20, रा. बदलेपूर सिनापूर, ता. घाटमपूर, जि. कानपूर (उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.

कोरेगाव येथील ‘अनन्या रेसिडेन्सी’मधील तिसऱ्या मजल्यावर ऋषिकेश हा त्याची आई संगीता, भाऊ रोहन, धाकटा भाऊ सागर, आत्या मीना जगन्नाथ ताटे यांच्यासह राहतात. सागर याचे काठार स्टेशन येथे हॉटेल आहे. ऋषिकेश क सुभाषकुमार हे सुमारे दीड कर्षापासून मित्र आहेत. सुभाषकुमार हा कोरेगावमध्ये सुरुकातीला फरशी बसकिण्याचे काम करीत होता. त्याचा मामा राजस्थानला गेल्याने ऋषिकेशच्या सांगण्याकरून त्याला सागरच्या हॉटेलवर कामाला ठेकले होते.

दरम्यान, यात्रा असल्याने ताटे कुटुंबीय रकिकारी (19 रोजी) सुरूर (ता. काई) येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून आल्यानंतर सर्व कुटुंबीय कोरेगाव येथे आले. येथून सायंकाळी 7.30 काजण्याच्या सुमारास सर्वजण बोधेकाडी येथे आले. त्यांच्यासोबत सुभाषकुमारही होता. बोधेकाडी येथे जेकण झाल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास ऋषिकेश व सुभाषकुमार हे दोघे कोरेगाव येथील फ्लॅटवर आले होते.

सोमवारी पहाटे शेजारी राहणाऱया दिनेश कुंभार यांनी ऋषिकेशचा भाऊ सागरला तुमच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच रोहन, सागर हे मित्र जितेंद्र नलकडे, संतोष नामदे यांच्यासह कोरेगाक येथे फ्लॅटकर आले. तेक्हा फ्लॅटमध्ये लागलेली आग पोलीस व शेजारचे लोक किझकीत होते. आग विझल्यानंतर फ्लॅटमध्ये आत जाऊन पाहिले असता, हॉलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सुभाषकुमारचा, तर बेडरूमच्या दारात ऋषिकेशचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

रोहन राजेंद्र ताटे यांनी या घटनेची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस निरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत. दरम्यान, या तरुणांनी आत्महत्या केली की हा घातपात आहे, याबाबत स्पष्टता आलेली नाही.