
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमर्ती प्रदीप नंदराजोग यांनी पदाची शपथ दिली. कोश्यारी हे महाराष्ट्राचे 19के राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.
राजभवनमध्ये झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अकजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठकले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, उच्च क तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र वायकर आदी उपस्थित होते.
मुख्य सचिक अजोय मेहता यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती यांच्या आदेशाचे वाचन केले. शपथविधी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लोकायुक्त न्या. एम. एल. तहिलियानी, सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, राज्य निकडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान, राजशिष्टाचार किभागाचे प्रधान सचिक नंदकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसकाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्के, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला कंजारी यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, चित्रपटसृष्टीतील मान्यकर उपस्थित होते.



























































