भाजपविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मोदी सरकारचा संकल्प रथ नाशिकच्या कोटमगावातून पिटाळला

उत्पन्न दुप्पट करतो, असे आश्वासन देऊन भीक मागायला लावली. टीव्हीवर त्यांचं तोंड पाहून वैतागलो, आता त्यांना गावात कशाला घेऊन आले. मोदी सरकारच्या योजना नको अन् विकासही नको, असा संताप करीत ग्रामस्थांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील कोटमगाव येथे भाजपाचा संकल्प रथ अडवला.

‘आपला संकल्प, विकसित भारत’ अशी टॅगलाईन देऊन पेंद्र सरकारच्या योजनांच्या प्रचारासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास योजनांचा गवगवा करणारा रथ देशभर गावोगावी फिरविण्यास सुरुवात केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील कोटमगाव येथे हा रथ गेला असता, ग्रामस्थ संतप्त झाले. उत्पन्न दुप्पट करतो, असे आश्वासन देऊन या सरकारने निर्यातबंदी लादून एका रात्रीत उत्पन्न निम्म्यावर आणले. भीक मागायला लावली. देशाला भीकेला लावले, असे सुनावत ग्रामस्थांनी हा रथ गावातून माघारी पाठवला. आम्ही बोलणार. आम्हाला जेलमध्ये टाकायचे तर खुशाल टाका. काही फरक पडत नाही, असे यावेळी महिलांनी ठणकावले.

मोदींनी देशाचं वाटोळं केलंय. रात्रीतून नोटबंदी, कांदा निर्यातबंदी करतात, लोकांना रात्रीतून रस्त्यावर आणतात, या सरकारचं काही खरं नाही. जनतेची एवढीच काळजी आहे, तर पेट्रोल, डिझेल, गॅस अर्ध्या भावात करा. बाकी गोष्टींची गरज नाही, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.

पेंद्रात व्यापारी सरकार बसलं आहे. आम्हाला त्यांचा विकास मान्य नाही. शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले आणि प्रत्यक्षात निम्मे केले. जनतेला भिकेला लावण्याचे काम या सरकारने केले. तुमचं आता काहीच आम्हाला नको. एक सेपंदही येथे थांबू नका, असे खडेबोलही शेतकऱयांनी सुनावले.

रथ नेला गोदामात

शेतकऱयांच्या या संतापाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने मोदी सरकारची नाचक्की आणि भाजपाची गोची झाली आहे. शेतकऱयांचा विरोध लक्षात घेऊन शनिवारपासून हा रथ येवला तहसील कार्यालयाच्या गोदामात उभा करून ठेवण्यात आला आहे.