राजकोटमध्ये दिसणार वेगळं गणित? पंतच्या जागी या नव्या खेळाडूची निवड

664
ks-bharat

मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळताना जखमी झाल्याने ऋषभ पंतच्या जागी आता नव्या विकेट किपरची निवड करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचा युवा क्रिकेटपटू केएस भरत याची निवड कर्णधार विराट कोहली याने केल्यानंतर सारेच चकित झाले आहेत.

ऋषभ पंत लवकरच मैदानात परतेल अशी बीसीसीआयला आशा होती. त्यामुळे संघात नव्या खेळाडूची निवड करण्यात आली नव्हती. मात्र ऋषभ पंत अद्याप फिट झालेला नाही. अखेर केएस भरत याची निवड करण्यात आली. भरत याची निवड करण्यात आल्यानंतर तो हैदराबादहून राजकोट येथे रवाना झाला आहे. अर्थात भरत लगेचच विकेटकिपींग करताना दिसणार नाही. कारण पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुल विकेट किपींगची जबाबदारी पार पाडत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या