कुडाळची आस्था मर्गज सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम, तालुक्यातील 25 शाळांचा निकाल 100 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी परीक्षेचा कुडाळ तालुक्याचा निकाल 98.73 टक्के एवढा लागला. तालुक्यातून 2126 विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी 2099 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कुडाळ हायस्कूलची विद्यार्थीनी आस्था आनंद मर्गज हिने 100 टक्के गुण मिळवून कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.

कुडाळ तालुक्यातील 34 हायस्कूलांपैकी 25 हायस्कूलचा निकाल 100 टक्के एवढा लागला. तालुक्यात द्वितीय क्रमांक प्रथमेश प्रकाश खोकरलकर 99.40 टक्के व तृतीय क्रमांक आकांक्षा राजन म्हाडेश्वर 99.20 टक्के (कुडाळ हायस्कूल) हिने मिळविला.

तालुक्यातील वालावल, जांभवडे, साळगांव, नेरूर, बिबवणे, आंब्रड, चेंदवण, न्यु इंग्लिश स्कूल कुडाळ, हळदीचे नेरूर, भडगाव, हिर्लोक, बॅ.नाथ.पै विद्यालय कुडाळ, डिगस, पांग्रड, वाडोस, पोखरण, मांडकुली, नेरूर माड्याचीवाडी, तेंडोली, वसोली, कुडाळ हायस्कूल इंग्लिश मिडियम स्कूल, बांव, डाॅन बाॅस्को स्कूल ओरोस, बेनगाव हायस्कूल व जांभवडे प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल जांभवडे या 25 हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला. तर न्यु इंग्लिश स्कूल ओरोस 96.92 टक्के, तुळसुली हायस्कूल 95.60 टक्के, कुडाळ हायस्कूल 96.69 टक्के, कसाल हायस्कूल 99.09 टक्के, पाट हायस्कूल 97.71 टक्के, सरंबळ हायस्कूल 95.83 टक्के, माणगांव हायस्कूल 98.66 टक्के, आवळेगाव हायस्कूल 97.36 टक्के, पणदूर हायस्कूल 98.81 टक्के असा निकाल लागला.