कुलगाममध्ये चकमकीत लश्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिह्यात बुधवारी लश्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाले. लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

कुलगामच्या मीर बाजार भागातील नवापोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची गुप्त खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराबंदी केली तसेच शोधमोहीम हाती घेतली होती.

याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला आणि चकमक उडाली. या चकमकीत दोघा दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोएबाचे सदस्य होते. कश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.