कुणाल कामरा यांचे आणखी एक ‘उंगली’ ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने पुन्हा एक ‘उंगली’ करणारे ट्विट करून सरन्यायाधीशांवर अश्लील शेरेबाजी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या ट्विटची दखल घेत अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी कुणाल विरोधात खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे. कुणालने याआधी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी करणारे ट्विट केले होते. त्याबद्दल कायदा शाखेचे दोन विद्यार्थी आणि दोन वकिलांनी कुणालविरुद्ध अवमानना याचिका दाखल करावी असे पत्र अॅटर्नी जनरल यांना लिहिले होते.