प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या कारने वृद्धाला चिरडले, पोलिसांनी केली अटक

2419

श्रीलंकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू कुशल मेंडिस याच्या गाडीने एका वृद्धाला उडवले असून यात त्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुशल मेंडिस याला अटक केली आहे. कोलंबो शहरातील पंदौरा येथे हा अपघात झाला आहे.

25 वर्षीय मेंडिसने श्रीलंकेसाठी 44 कसोटी सामने तर 76 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो संघाचा विकेटकिपर आहे. मेंडिसला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून तिथे त्याचे पुढिल भविष्य ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या