
केरळच्या साक्षरता मोहिमेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या के. व्ही. राबिया यांचे आज येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. 2022 मध्ये सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल राबिया यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. स्वतः शारीरिकदृष्टय़ा विकलांग असूनही सामाजिक कार्यात राबिया यांनी स्वतःला झोकून दिले होते. 14 व्या वर्षी पोलिओमुळे अपंगत्व आल्याने त्यांना शाळेत जाणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी घरातूनच शिक्षण सुरू ठेवावे लागले.