‘क्यार’मुळे पर्यटन व्यवसायाला ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

र्यटन व्यवसायाला दिवाळीपासून सुरुवात होते; परंतु अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘क्यार’ चक्रीवादळाच्या तडाख्यात पर्यटनाच्या हंगामाला सुरुवातीलाच बेक लागला आहे. पर्यटकांनी केलेले आगाऊ बुकिंग रद्द केले असल्यामुळे ऐन हंगामात पर्यटन स्थळे सुनीसुनी दिसून येत आहे. पर्यटन हंगामाची सुरुवात ज्या दिवाळीच्या सुट्टीत होते त्याच्या सुरुवातीला या वादळामुळे समुद्रात व खाडीपात्रात असलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या वॉटर स्पोर्टस्, पॅरासेलिंग, बोटी पुन्हा किनाऱयावर आणण्यात आल्या.

किल्ले सिंधुदुर्ग दर्शनही बंद!

दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक अरबी समुद्रातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी येतात. दिवाळी सुट्टीच्या हंगामात पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. मात्र समुद्री वादळामुळे किल्ले दर्शन बंद आहे. प्रवासी होडय़ा बंद असून किनाऱयावर आहेत.