काम करताना हायटेन्शन वायर अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लेबर कॅम्पमधील वायर गुंडाळत असताना हायटेन्शन वायर अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना आंबेगाव बुद्रूकमधील श्री संकुल बिल्डिंग भैरवनाथ मंदीराजवळ घडली. संजीवन फागूराम साहू (वय 40, रा. आंबेगाव ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंत्राटदार लक्ष्मण रुपला राठोड (वय 40, रा. आंबेगाव बुद्रूक ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण राठोड कंत्राटदार असून त्यांनी राहत्या घरातून इमारतीमागे असलेल्या मोकळ्या जागेत लेबर कॅम्पला अनधिकृतरित्या वीज कनेक्शन दिले होते. त्यांच्या सांगण्यावरुन संजीवन लेबर कॅम्पमधील वायर गुंडाळत होता. त्यावेळी हायटेन्शनची वायर अंगावर पडल्यामुळे संजीवनला वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर अधिक तपास करीत आहेत.