
सामना ऑनलाईन । मुंबई
सणउत्सवांच्या तोंडावर खाद्यपदार्थांत मोठय़ा प्रमाणात भेसळ केली जाते. तिला आळा घालण्यासाठी आता ‘एफएसएसएआई’ प्राधिकरणाने दिल्ली आणि मुंबईत मोठी खाद्य प्रयोगशाळा उभारण्याचे ठरवले आहे. गाजियाबाद आणि कोलकाता येथे ‘एफएसएसएआई’च्या मोठय़ा खाद्य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. नेपाळ सीमेजवळही रक्सौल येथे प्रयोगशाळा आहे. त्याचबरोबर देशभरात 250 हून जास्त खाद्य प्रयोगशाळा आहेत.





























































