कामगार कायद्यातील बदलामुळे श्रमिकांवर वेठबिगारीची वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीनशेपेक्षा कमी कामगार संख्या असणारे उद्योग सरकारची परवानगी न घेता बंद करण्यास केंद्र सरकारने मुभा दिली आहे. केंद्राचा हा निर्णय कामगारांना उद्धवस्त करून त्यांना भांडवलदारांचे वेठबिगार बनविणारा आहे अशी टीका माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

केंद्र नवीन कृषी विधेयके आणून शेतक-यांना उद्धवस्त केले आहेच आता कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांवर वेठबिगारीची वेळ येणार आहे. पहिले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभी केलेली कामगार चळवळ मोडीत वाढण्याचे हे कारस्थान आहे असे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज उद्योग बंद पडत आहेत. लाखो लोक बेरोजगार होत आहेत, अशा कठिण प्रसंगी कामगारांच्या हितांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. पण मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग खासगी भांडकलदारांना विकून कामागारांना बेरोजगार करत आहे. अदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का, असा प्रश्न हुसेन दलवाई यांनी केला.