महिला दिन गेला, गुढीपाडवाही झाला… लाडक्या बहि‍णींचा फेब्रुवारीचा हप्ता लटकला, खात्यात रक्कम कधी येणार? तारीख आली समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरीब आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही. महिला दिनच्या दिवशी हप्ता मिळणार… नंतर गुढीपाडव्याच्या दिवशी हप्ता मिळणार अशी आवई उठली, मात्र मार्च एण्ड आला तरी महिलांच्या खात्यात दमडी जमा झाली नाही. हप्ता मिळणार तरी कधी? असा सवाल विचारणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता मोठी अपडेट आली आहे.

फेब्रुवारी महिन्याचा सन्मान नीधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तटकरे यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे, असे ट्विट आदिती तटकरे यांनी केले आहे.